प्रतिनिधी : यशवंत महाजन कल्याण.संपर्क : ९९३०७५१२५७कल्याण पश्चिमच्या काळा तलाव परिसरात तरूणाईने एकत्र येऊन महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन बासरे यांच्यासाठी प्रभातफेरी काढली.
हातात मशाल घेऊन तरूणांनी बासरे यांचा जोरदार प्रचार केला. शिवरायांच्या जयघोषाने तरूणांनी काळा तलाव परिसर दुमदुमून सोडला होता. त्यांच्या हातात दिसणारे परिवर्तनाचे फलक या चळवळीला अधिक बळकटी देत होते. यामध्ये स्थानिक तरुणाईबरोबरच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रभातफेरीला मिळालेला प्रतिसाद पाहता, कल्याण पश्चिममध्ये बासरे यांना मिळणारा जनसमर्थनाचा ओघ वाढत चालल्याचे स्पष्ट होते आहे.
“कल्याण पश्चिमच्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार पायाभूत सुविधा, उत्तम शिक्षण, आरोग्यसेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य आहे. परिवर्तन ही काळाची गरज असून, आपण सर्वांनी एकत्र येऊन हा बदल घडवला पाहिजे,” हे सचिन बासरे यांचे व्हिजन आहे.प्रभातफेरीत उपस्थित नागरिकांनी याचे कौतुक केले आहे. “सचिन बासरे हे केवळ एक राजकीय नेते नसून लोकांच्या समस्यांना समजून घेणारे आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व आहे,” असे अनेकांनी व्यक्त केले.ही प्रभातफेरी केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता, आगामी निवडणुकीत बासरे यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Discussion about this post