*तालुका धर्माबाद प्रतिनिधी चैतन्य घाटे…धर्माबाद-येथील नगरपालिका कार्य कक्षेत असणाऱ्या मौजे बाळापुर येथील बौद्ध धर्मीयांचा अंतिम संस्कार आज घडीलाही उघड्यावरच होत असून ती जागा सुद्धा त्यांच्या हक्काची नसल्यामुळे शासन व प्रशासनास ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आज नगरपालिकेचे अनेक पुरस्कार प्राप्त स्वच्छता विभाग प्रमुख अशोक घाटे यांच्या धर्मपत्नी तथा सिद्धार्थ नगर प्रभागातून गेल्या नगरपालिका निवडणुकीतून अवघ्या 25 मताने पराभव पत्करणारे व भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष चैतन्य घाटे यांच्या मातोश्री सागरबाई अशोक घाटे यांचे निधन झालं होतं. चैतन्य घाटे यांनी बाळापूर येथे सर्व धर्मीयांसाठी एकच सुसज्ज अशी स्मशानभूमी व्हावी यासाठी अनेक आंदोलने केली.
शासन व प्रशासनाकडे पाठपुरावाही केला पण आज घडीलाही बाळापुर वासियांसाठी सर्व धर्मीयांसाठी अद्ययावत अशा स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक व स्थानिक राज्यकर्ते यांना यश मिळाले नाही ही एक शोकांतिकाच आहे. *चौकट-* आमदार राजेश पवार यांनी जेव्हा मोठ्या तलावाजवळील जागेची पाहणी करीत सदरील जागा या कुठलीही निर्विवादित जागा बाळापुर वासियांनी नगरपालिकेला हस्तांतर करून दिल्यास मी हायटेक स्मशानभूमी बांधून देईन असा शब्द दिला होता. पण जागे अभावी ते काम होऊ शकले नाही. आज घडीला मोठ्या तळ्याच्या आजूबाजूस मोठी शासकीय जागा रिकामी असून त्या जागेसाठी बाळापुर वासीय आपल्या गावच्या विकासासाठी हट्ट का धरत नाहीत? राजकीय गटबाजी आहे का? आपल्या गावाचा विकास साधण्याची त्यांची क्षमता नाही का?
असे अनेक नानाविध प्रश्न आज उघड्यावर होत असलेल्या ते पण बिन हक्काच्या जागेत अंतिम संस्काराच्या वेळी अनेक नागरिक बोलत होते.*चौकट-*ज्या तरुण युवकांनी आपल्या बाळापुर गावात बौद्ध धर्मीयांसाठीच नाही तर सर्व धर्मीयांसाठी आद्ययावत अशी स्मशानभूमी व्हावी या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा दिला त्या चैतन्य घाटे यांच्या मातोश्रीचे आज घडीला उघड्यावरच अंतिम संस्कार करावे लागले.
Discussion about this post