191 पेण विधानसभा मतदार संघातील ग्रूप ग्रामपंचायत दुष्मी
खारपाडा येथील रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल खारपाडा येथे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण युवा फ्रेंड्स
सर्कल फाउंडेशन(एनजीओ)चे संस्थापक अध्यक्ष आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला. सोबत महिला अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या सौ.मयुरी कैलास घरत, आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आण्णासाहेब श्री.कमलाकर बाबू घरत, आईसाहेब सौ. निर्मला कमलाकर घरत.
मतदान करूया ; लोकशाही बळकट करूया!
लोकशाहीच्या अधिकाराने करूया आज मतदान!
योग्य सरकार निवडून वाढवूया महाराष्ट्राची शान!!
यावेळी नागरिकांना लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असे आवाहन यावेळी पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांनी केले. आपले मत अमूल्य आहे योग्य उमेदवारास मत देऊन आपल्या भागाचा विकास करण्यासाठी, रोजगार, शिक्षण आणि आरोग्य प्राथमिक सोयी सुविधा यांच्यावर भर देणारा सुशिक्षित आणि प्रशासकीय अभ्यास असणारा उमेदवार निवडून देऊया…
आपले मत परिवर्तनासाठी..आपले मत विकासासाठी यावेळी
खारपाडा, ठाकूरपाडा येथील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष आणि युवक, युवती वर्ग मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजावत होते. ग्रूप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा मध्ये एकूण २३३८ मतदान झाले. वॉर्ड प्रमाणे झालेले मतदान
दुष्मी वॉर्ड क्रमांक १) एकूण ६६३ मतदान
खारपाडा वार्ड क्रमांक २) एकूण ९३५ मतदान
खारपाडा वार्ड क्रमांक ३) एकूण ७४२ मतदान
ग्रूप ग्रामपंचायत दुष्मी खारपाडा मध्ये सरासरी ८०% मतदान झाले.
Discussion about this post