मेहुना राजा वनपरिक्षेत्रात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक : वनविभागाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क देऊळगाव मही विधानसभा निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. महसूल अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने देऊळगाव मही परिसरात रेती माफिया सुसाट झाले आहे. आळंद वन बिटमधील मेहुणा राजा वनविभागाच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करण्यात येत आहे.
आळंद बिटमधील मेहुणा राजा, रोहणा फाटा, तसेच गारगुंडी या परिसरात ठिकठिकाणी अवैध रेती वाहतूक करण्यासाठी रस्ते तयार करण्यात आले आहेत. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक
करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी वेळोवेळी वनविभागाच्या हद्दीतून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी बनविलेले रस्ते तत्काळ कायमस्वरूपी बंद करावे, अशा आशयाचा सूचनाही दिल्या आहेत. मात्र, वनविभागाच्या हद्दीतील रेतीमाफियांचे रस्ते अद्यापही बंद झालेले नाही. त्यातच सध्या महसूलचे अधिकारी निवडणुकीत व्यस्त असल्याने याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध वाहतूक करीत आहेत. वनविभागाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.
Hello Buldhana
Powered by: erelego.com
वनविभागाचे पथक स्थापन
देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या पत्राच्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी आळंद बिटचे वनरक्षक ए. व्ही. बाभूळकर, वनमजूर विष्णू डोईफोडे आणि रोजंदारीवरील वनमजूर यांचे पथक स्थापन केले आहे. मात्र, या पथकाने आतापर्यंत एकही कारवाई केलेली नाही.
वनरक्षक सुटीवर
वनपरिक्षेत्रात होत असलेल्या अवैध उत्खननाविषयी वनरक्षक बाभूळकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपण सुटीवर असल्याचे सांगितले. तसेच वनरक्षक मुरकुट यांच्याकडे प्रभार असल्याचे सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
Page No. 2 Nov 19, 2024
आळंद बिटमधील वनविभागाच्या हद्दीतून अवैध रेती वाहतूक होत अनेक तक्रारी प्राप्त रस्ते कायमचे बंद करून नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
तहसीलदार, देऊळगाव राजा
- वैशाली डोंगरजाळ,
Discussion about this post