मौजे धनकेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील पुसद भोजला लाखी MDR रस्ता लगत चे शेत सर्व्हे नंबर १/२ व १८/२ ,१/१/अ श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क ले आऊट चे मालक बीड येथील रहिवाशी असलेले शेख जुबेर शेख इसाक व शेख शोएब शेख जुबेर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री प्रकाश झळके यांच्याशी संगनमत करून सदर ले आऊट MDR रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण केले आहे श्री प्रकाश झळके उपविभागीय अभियंता यांनी दिनांक २१/०३/२०२४ पत्राचे जावक क्र २१७ नुसार सदर ले आऊट धारकाने इमारती रेषेचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट निदर्शनात आले आहे तेव्हा सदर रस्त्याच्या माधानापासून ३० मीटर च्या आत इमारतीचे बांधकाम होणार नाही या दृष्टीने सदर ले आऊट ला राजस्व विभागाकडून मंजुरी घेऊनच प्लॉट ची विक्री करावी अन्यथा जनते च्या होणाऱ्या आर्थिक नुकसानीस आपण स्वता जवाबदार रहाल असे लेखी पत्रात नमूद केले होते.
त्या नंतर दिनांक ०१/०८/२०२४ जावक क्र Q च्या पत्रा नुसार अतिक्रमण हटविण्याची नोटीस सदर ले आऊट च्या कमानीवर वर लावण्यात आली होती तरी सुद्धा आज पर्यंत सदर ले आऊट चे अतिक्रमण श्री प्रकाश झळके व कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी मैडम यांनी काढले नाही.
उलट दिनांक ०५/०९/२०२४ जावक क्र ८८५ रोजी भविष्यात सदर ले आऊट मालक संबंधित केलेले अतिक्रमण स्व खर्चाने काढतील असे पत्र देऊन त्यांच्याशी संगमत केले व जनतेची व प्लॉट आधारकाची दिशा भूल करून खरेदी करण्याचा मार्ग मोकळा करून दिला.
सदर ले आऊट संबंधी जेव्हा जेव्हा माहितीच्या अधिकार खाली माहिती मागितली असता त्यांनी खोटी चुकीची व अर्धवट माहिती देऊन दिशा भूल केली व प्रकरण दाबण्याचे पर्यत केले
तरी श्री प्रकाश झळके उपअभियंता यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून व संबंधित ले आऊट मालक यांचावर कार्यवाही करावी करता सादर चे प्रकरण पुसद येथील वरिष्ठ न्यायालयात सुरु आहे.
लवकरच सदर चे प्रकरण मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री यांचे सचिव यांचा कडे दाखल केले आहे सदर जमीन हि वर्ग २ ची असतानी वर्ग १ ची कशी करण्यात आली यांची मंत्रालयातून माहिती मागण्यात येणार आहे तेव्हा ले आऊट धारकावर लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सदर प्रकरणाची चौकशी मा.अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत करण्यात येत आहे.
Discussion about this post