मुक्ताईनगर व् रावेर विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले सकाळी मतदान करण्यासाठी मतदारांचा निरुत्साह दिसुन आला त्यामुळे सकाळी 12 वाजेपर्यन्त फक्त 16% च मतदान झालेले होते पण दुपारी 2 वाजेपासुन मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या म्हणुन सायंकाल पर्यन्त हा आकड़ा 59% वर पोहचला.
सावदा येथे काही मतदान केंद्रावर मतदान वेळेवर सपन्न झाले पण 28 नंबर वरील केंद्रावर मतदारांनी रात्रि 9 वाजेपर्यन्त मतदानाचा हक्क बजावला तेथील मतदान मशिन संथ गतीने चालत असल्याची ओरड मतदार करीत होते.
एकंदरित मुक्ताईनगर व् रावेर विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडुन आला नाही व् दोन्ही ठिकाणी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली
यावेळी मतदान कमी टक्के झाल्याने उमेदवार थोड़े चिंतेत दिसुन आले आता 23 तारखेला लागणाऱ्या निकाला कड़े सर्व जनतेचे लक्ष लागलेले आहे मतदार राजाचा कौल यावेळी कोणाला मिळतो हे पाहण्यासाठी उमेदवार ही सज्ज होऊन निकालाची प्रतिक्षा करीत आहे.
Discussion about this post