प्रवीण इंगळे –तालुका प्रतिनिधी
मो 7798767266
उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे आदिवासी समाजाने क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती पारंपारिक नृत्याने साजरी करण्यात आली झारखंड राज्याच्या राचीच्या उलिहातू गावात सुगना मुंडा व करमी हातू यांच्यापोटी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला त्यांना समाजाबद्दल आपुलकी असल्यामुळे आदिवासी समाजातील लढावया युवकांना एकत्र करून इंग्रजा विरुद्ध युद्ध पुकारले ते युद्ध 1897 ते 1900 या काळात झाले होते 3 फेब्रुवारी 1900 रोजी बिरसा व त्यांच्या साथीदारांना अटक झाली.
आणि राची येथील कारागृहात 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडाचे निधन झाले तेव्हापासून बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केली जाते
त्या पद्धतीने बाळदी येथे बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती त्यामध्ये संस्कृत पद्धतीने गावामध्ये रॅली काढण्यात आली होती या कार्यक्रमाचा आनंद सर्व गाव समुदायांनी घेतला व सर्व कार्यक्रम शांततेत पार पाडला.
कार्यक्रमाच्या वेळी उमेश पोटे, रामदास पोटे, बाबू डुकरे, देवराव पोटे, प्रभाकर शेळके, बंडू पोटे, सटवा पोटे,शिवाजी जंगले, किशोर मारुती पोटे, भारत वायकुळे, संजय डुकरे,मारुती वानोळे, सुरेश डुकरे, अंबादास खुडे, मनोज खोकले,अविनाश बेले, शामराव पोटे,संभाजी खूपसे, नारायण खूपसे, सोनबा खराटे, साहेबराव पोटे, रामराव मुरमुरे, गणेश आढाव,विकास आढाव,गजानन शेळके, बालाजी टिपरे, किशोर मारोती पोट, ज्ञानेश्वर दुधे व इतर मंडळी उपस्थित होते.
Discussion about this post