लोणार तालुका प्रतिनिधी सुनिल वर्मा :-
दिनांक २५/११/२४
लोनार जवळील मातमळ शिवारात प्रल्हाद इरतकर यांच्या शैतातील शेततळ्यात त्यांना एक मोठा सांप आढळला त्यांनी लगेच सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना फोन केला व सांगितले शेततळ्यामध्ये एक मोठा साप आढळलेला आहे विनय कुलकर्णी हे सर्व सर्पमित्र यांना घेऊन पोहोचले शेततळ्यात पाणी असल्यामुळे साप ताबडतोब आत जात होता अनेक प्रयत्नानंतर शेवटी शेततळ्यात उतरण्याचा निर्णय घेतला व चार सर्पमित्र पाण्यामध्ये उतरले बंटी नरवाडे, चंदू अंभोरे, रुतिक सुसर व विलास पाटील खरात हे सर्पमित्र पाण्यात उतररले पाण्यमध्ये शेवाळ गाळ पाणी हे सर्व होते त्यामुळे त्याला शोधण्यास खूप वेळ लागला.
हे रेस्क्यू ऑपरेशन जवळजवळ दोन तास चालले व शेवटी त्याला पकडण्यात यश आले त्याला तिथे रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले अजगर हा शेड्युल वन मधला प्राणी आहे त्यामुळे वन्यजीवाचे कर्मचारी वनरक्षक ठाकरे यांना कळवले होते व ते घटनास्थळी पोहोचले या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये निसर्ग मल्टीपर्पज फाउंडेशन चे संस्थापक सर्पमित्र विनय कुलकर्णी, सर्पमित्र कमलेश आगरकर, ‘मी लोणारकर’ टीमचे सर्पमित्र सचिन कापुरे, विलास जाधव, उमेश चिपडे, विशाल वर्मा,बंटी नरवाडे, चंदू अंभोरे, रुतिक सुसर व विलास पाटील खरात तसेच वन्यजीव विभागाचे कर्मचारी गोविंद मोरे, बाळू जावळे, डेंगले तसेच मातमळ येथील शेतकरी ओम शिंदे, अमोल इरतकर, गणेश शिंदे, रामदास शेरे, किशोर गवई, महेश शिंदे, अशोक इरतकर इत्यादी उपस्थित होते.
Discussion about this post