सेलू/प्रतिनिधी
दिनांक २६ नोव्हेम्बर २०२४ रोजी भारतीय संविधान दिवस म्हणून संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रत्येक भारतीयांना समता, स्वातंत्र्य व बंधुता,समाजवादी,धर्मनिरपेक्षता यां तत्वाचे स्मरण व्हावे व संविधानाने दिलेले अधिकार व हक्क कळावे म्हणून उपस्थित बंधू आणि भगिनीकडून संविधानाची प्रास्तविका वाचन करण्यात आली.
कार्यक्रम स्थळी शहरातील नविनकुमार पाटील, हनुमंत तेलंग,बंधू जामनकरसोपान टेम्भुरने,ताराचंद पोपटकर,सिद्धार्थ जंगले,मधुकर तेलंग,अनिल कांबळे,बंडूजी चहांदे,प्रशांत वैरागडे,रमाबाई चाटे,सीमा तेलंग,रजनी तेलंग,आशा कांबळे व शहरातील बंधू भगिनी उपस्थित होते.
Discussion about this post