वणी: येथील श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थाद्वारा संचालित वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
संविधान दिवसाच्या औचित्याने शाळेत विशेष असेम्ब्लीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
संस्थेचे सचिव मा. ओमप्रकाश चचडा साहेब यांनी विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देत संविधानातील अंतर्भूत स्वातंत्र, समता व बंधुता इत्यादी संविधानिक मूल्ये आचरणात आणण्याची गरज विषद केली. शाळेचे प्राचार्य श्री. प्रफुल महारतळे यांनी संविधान सभेची स्थापना, संविधान निर्मिती प्रक्रियेवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. प्रणोती खडसे, संचालन सौ. शुभांगी बल्की तसेच आभार प्रदर्शन सौ. अर्चना हजारे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .
Discussion about this post