ठाणे प्रतिनिधी :- मनोज अंबिकर कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीत अग्नितांडव, केडीएमसीची २६/११/२०२४ अग्निशमन यंत्रणा ठरली कुचकामी
Kalyan Vertex Building कल्याणमध्ये गगनचुंबी व्हर्टेक्स या इमारतीला भीषण आग लागली. इमारतीतील १५व्या मजल्यावर ही आग लागली. मात्र या आगीमुळे १६ आणि १७ मजल्यावरील घरांचं मोठं नुकसान झालं आहे. कल्याण पश्चिमेतील व्हर्टेक्स या नामकिंत गगनचुंबी हाय फोफ्राईल सोसयटीतील १५व्या मजल्यावर आग लागली. संतोष शेट्टी यांच्या घराला आग लागल्याची घटना मंगळवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. अचनाक आग लागल्यानंतर या आगीने मोठा पेट घेतला आणि धुराचे लोट उठले. लांब पर्यंत या धुराचे लोट दिसत होते. महत्त्वाची बाब म्हणजे वेळेत आगीवर नियंत्रण न मिळाल्याने १५व्या मजल्यावरील आगीचे लोट हवेमुळे डॉ. सुमित श्रीवास्तव यांच्या १६व्या आणि १७व्या मजल्या वरील डॉ. नितीन झबक यांच्या घरापर्यंत पोहचले, यामुळे या आगीत तीन मजल्यावरील सदनिका जळून खाक झाल्या आहेत. विशेष म्हणजे याच बिल्डिंगमध्ये केडीएमसी पालिकेच्या सिटी इंजिनिअर देखील राहतात.
उंच इमारतीमधील आग विझवण्यासाठी केडीएमसीकडून ५५ मीटर लांबीची शिडी असलेली अद्यावत गाडी घेण्यात आली होती, मात्र ही गाडी बंद असल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागला मोठी कसरत करावी लागली. तर अग्निशमन दलाच्या गाड्या उशिराने आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. यामुळे केडीएमसीची अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचे दिसून आले.
कल्याण – डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी घटनास्थळी पोहचत परिस्थितीची माहिती घेतली. तसंच ५५ मीटर शिडी असलेली अग्निशमन गाडी तांत्रिक बिघाडामुळे कार्यान्वित नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे ठाणे मनपाकडून गँल्डर अग्निशमन गाडी पाचरण करण्यात आली. पोलीस प्रशासन आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. इमारतीतील रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढलं असल्याचे आयुक्तांनी सांगितले. याआगीच्या घटनास्थळी मनपा आधिकारी कर्मचारी असा मोठा फौजफाटा उपस्थित होता.
Discussion about this post