कोपरगाव तालुका प्रतिनिधी —
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला घवघवीत ऐतिहासिक विजय मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ना.गिरीश महाजन,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या.
भाजपा पक्षाने सलग तीनही विधानसभा निवडणुकीत तीन अंकी जागा जिंकण्याचे कसब सिद्ध केले आहे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय संपादन करून सर्व तर्क वितर्क फोल ठरवले आहे.कोपरगाव विधानसभा जागेवर कोल्हे कुटुंबाने घेतलेल्या भूमिकेमुळे तेथे मोठा विजय संपादन झाला याबद्दल सर्वच नेत्यांनी कौतुक केले आहे.
भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वाधिक सदस्य असणारा मोठा पक्ष असून आगामी काळात अधिकाधिक जनहिताची कामे मार्गी लावण्यासाठी प्राप्त झालेले बहुमत उपयुक्त ठरणार आहे.यासह कोपरगाव मतदारसंघ आणि विविध ठिकाणच्या प्रलंबित प्रश्नांना सोडवण्यासाठी या नेत्यांचे विशेष योगदान असणार आहे.विवेक कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या सर्व नागरिकांच्य वतीने व बिपीनदादा कोल्हे,सौ.स्नेहलताताई कोल्हे व कोल्हे कुटुंबाच्या वतीने भरघोस यशाबद्दल नेत्यांना भेट घेत शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post