निलंगा,दि.२६
भारत देशात विविध धर्म, संप्रदाय,भाषा,चालिरीती असतानाही,सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे भारतीय संविधान आहे.
या संविधानाने आपल्या देशात अद्वितीयरितीने लोकशाही शासन दृढमूल केले आहे.
म्हणून त्याचे आपल्या जीवनात महत्व आहे.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष आहे,असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संविधान दिनी केले. ते येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित केलेल्या ‘भारतीय संविधान दिवस’ समारोहात काढले.
यावेळी वंचीतचे अंकुश कांबळे, माजी नगरसेवक विष्णू ढेरे , दिगंबर सूर्यवंशी,रमेश ढेरे ,रमेश वाघोले,दिनेश कांबळे,पत्रकार मिलिंद कांबळे,उमाकांत पेठकर,सूरज पंडागळे आदी उपस्थित होते..
तत्पूर्वी तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून सुरु झालेल्या या समारंभात सुरवातीला सर्व उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामुदायिकपणे वाचन करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेवक विष्णू ढेरे यांनी केले.
यावेळी बौद्ध उपासक उपसिका उपस्थित होते..
Discussion about this post