लोणार ता प्र :-सुनिल वर्मा
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती तथा ज्ञानोदय विद्यामंदिर भक्तिधाम चांदूरबाजार द्वारा आयोजित विभागस्तरीय फुटसल स्पर्धेत लोणार सेंट्रल पब्लिक स्कूलच्या १७ वर्षातील मुलींचा संघ उपांत्य सामन्यात स्कूल ऑफ स्कॉलर अमरावती संघाविरुद्ध २-१ तर अंतिम सामन्यात ज्ञानोदय इंग्लिश माध्यमिक स्कूल, चांदूरबाजार चा २-० ने पराभव करून दणदणीत विजय संपादन करून राज्य स्तरावरील स्पर्धेकरीता पात्र ठरला आहे. सदर मुलींच्या संघात यशस्वी खेळाडू भाविका भंडारी, दिव्या घुले, अपूर्वा मापारी, वेदिका बोडखे, रोशनी पारवे, प्रांजल मापारी, ऋतुजा गावंडे, स्वरा चौधरी, आकांक्षा राऊत, गौरी गावंडे, श्रुती सानप, विभा जाधव आहेत.
त्यांच्या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष शेख मसूद, प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी, उपप्राचार्य नबिल शेख, व्यवस्थापकीय संचालक मो. फैसल व सर्व शिक्षकांनी विजयी संघाचे व फुटबॉल कोच लियाकत अली यांचे अभिनंदन केले.
Discussion about this post