सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी, बालाजी गोकनूर:-
तालुक्यातील विविध गावातील लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत अनेक अडचणी असून,अनेकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा या परिसरात उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे . बिलोली तालुका हा अनेक ग्रामीण भागास जोडणारे महत्त्वाचे स्थान असून,या ठिकाणी हजारो मजूर,कामगार,शेतकरी कुटुंब वास्तव्यास असतात .या परिसरातील मागासलेपणामुळे आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने अनेक कुटुंबामध्ये विविध आजारांच्या समस्या असून या आजारावर उपचार करण्यासाठी त्यांना त्या परिसरामध्ये उच्च दर्जाची रुग्णसेवा उपलब्ध नाही या परिसरातील गोरगरीब रुग्णांसाठी उच्च दर्जाचे रुग्णसेवा मिळावे या हेतुने या तालुक्याचे भूमिपुत्र खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी या परिसरात सर्वसामान्यांसाठी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे या मागणीसाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री जगत प्रकाश नड्डाजी यांची भेट घेऊन त्यासाठी मागणी केली. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे स्वतः डॉक्टर असल्याने व या भागातील सर्वसामान्यांची जाण असल्याने,येणाऱ्या काळात या परिसरातील जनतेसाठी उच्च दर्जाचे मल्टीस्पॅलिटी हॉस्पिटल निर्माण होईल यात काही शंका नाही.

Discussion about this post