लोणार ता प्र सुनिल वर्मा :-
भारतीय स्टेट बँकेच्या लोणार शाखेतील कामकाजावर ग्राहक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. शाखेतील एटीएम अनेक दिवसांपासून बंदच होते, ते 3-4 दिवसापूर्वीच सुरू करण्यात आले. सुरू आसल्यावर सुद्धा त्या मध्ये पुरेसे रोख नसते.नागरिकांना रोख रक्कमेसाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे. त्यामुळे किरकोळ कामासाठीही शाखेत जावे लागते. बँक कर्मचाऱ्यांचा दुर्लक्ष करणारा आणि उदासीन वागणूक, तसेच ग्राहकांना वेळेवर सेवा न मिळणे यामुळे लोणार येथील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.
कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा, ग्राहकांसाठी वेदनादायक
शाखेतील काही कर्मचाऱ्यांचा वर्तनात जाणवणारा हलगर्जीपणा देखील चर्चेत आला आहे. ग्राहकांशी नीट संवाद साधण्याऐवजी त्यांना वारंवार टोलवाटोलवी केली जाते. छोटे-छोटे कामे करण्यासाठी अनेकदा शाखेत फेऱ्या माराव्या लागतात, एटीएम साठी नीट फॉर्म भरून दिल्यावर सुद्धा अपूर्ण नावाने एटीएम दिल्या जातो, ज्यामुळे ग्राहकांना अडचणी निर्माण होत आहेत.अशी तक्रार ही मोहम्मद रिजवान जड्डा सह अनेक ग्राहकांची आहे.
खासगी बँकांची सेवा आकर्षक, कल वाढतोय
एसबीआय शाखेतील या त्रासामुळे अनेक ग्राहक खासगी बँकांकडे वळत आहेत. खासगी बँका जलद सेवा, विनम्र कर्मचारी आणि ऑनलाइन सोयीसाठी ओळखल्या जात असल्याने ग्राहकांचा कल त्या दिशेने वाढत आहे. शिवाय खासगी बँकेत काम अवघ्या काही मिनिटांत होते, इथे मात्र एका सहीसाठीही तासंतास वाट पाहावी लागते, असे नाराज ग्राहकाचे सांगणे आहे.
सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा
शाखेतील सेवा लवकर सुधारली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोणारचे सामाजिक कार्यकर्ता अॅड.मो.रिजवान जड्डा यांनी दिला आहे.
“आमची मागणी सोपी आहे, वेळेत आणि व्यवस्थित सेवा मिळावी,” असे अॅड. रिजवान जड्डा यांनी स्पष्ट केले.
सध्या, यावर एसबीआय प्रशासना काय कारवाई करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
Discussion about this post