प्रतिनिधी :- सतिश्र्वर नेवारे
गोंडपिपरी :- राजुरा तालुक्यातील श्री जोगापूर हनुमान मंदिरात पवित्र मार्गशीर्ष मासाच्या आरंभापासून सुरू होणाऱ्या जोगापूर यात्रेचे उद्घाटन केले. महसुली रिट असलेल्या श्री जोगापूर हनुमान मंदिरात अनेक वर्षापासून मार्गशीष महिन्यात यात्रा भरत आहे. सदर यात्रेस दरवर्षी लाखोच्या संख्येने दर्शन करण्याकरिता लोक येतात. परंतु हा संपूर्ण परिसर वनव्याप्त असल्याने अतिशय संवेदनशील आहे. या ठिकाणी जंगली प्राण्यांचा वावर असतो त्यामुळे कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता वन विभागाने आवश्यक त्या उपाययोजना व बंदोबस्त, केला आहे.
दर्शनाला येणाऱ्या भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, आणि स्वच्छता गृहाची व्यवस्था यासह परिसरातील गावाशी योग्य समन्यव ठेवून ही पवित्र यात्रा सकारात्मक वातावरणात पार पडेल व भाविक भक्तांना सुलभ होईल अशा पद्धतीने यात्रा काळाचे नियोजन करावे. अशा सूचना यावेळी आमदार श्री देवराव भोंगळे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यासह संबंधितांना केल्या.
Discussion about this post