सारथि महाराष्ट्रचा
प्रतिनिधी उमेश धुमाळ
या अतिविषारी सापाचा हनीमून जोरात आहे.
साहजिकच इतर वेळी दडून असलेले हे सर्प सध्या अडगळीच्या ठिकाणांमधून बाहेर पडतात.
हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून ऊब मिळवण्यासाठी ऊन्हात येऊन बसतात.
या कालावधीत यांच्या बाहेर पडण्याने सर्पदंश होण्याच्या प्रमाणात विलक्षण वाढ होते.बागकाम करणार्या बागप्रेमींनी,शेतात काम करणार्या शेतकर्यांनी तसेच निसर्गभ्रमंती करणार्या हौशी नागरिकांनी व गिर्यारोहकांनी स्वत:ची विशेष काळजी घेणे खुप गरजेचे आहे.
अडगळीच्या ठिकाणी काम करताना अथवा फिरताना पायात घोट्यापेक्षा जास्त उंचीचे बुट वापरावेत.
अडगळीच्या ठिकाणी थेट हात न घालता काम करताना त्या ठिकाणी लांब काठी फिरवून घ्यावी.
दार बंद केल्यावर फट राहणार नाही याची काळजी घ्यावी,बाथरूमच्या पाईपला जाळी बसवलेली असावी.
मोकळ्या शेतात,रानात घर असणार्यांनी मांजर पाळणे फायद्याचे ठरते.
मांजर अशा सरपटणार्या प्राण्यांबद्दल आपणास कळत-नकळत सावधान करते,त्यामुळे पुढील अनर्थ टाळता येतात.
या सापाचा मुख्य नैसर्गिक शत्रू म्हणजेच मुंगुस त्याच्यामुळेही घोणसची संख्या नियंञणात येते.
पाठीवर असणार्या बदामी आकाराच्या एकसारख्या नक्षीवरून घोनस् ओळखले जाउ
शकतात.
Discussion about this post