धरणातून एक हजार पन्नास क्यूसेस ने विसर्ग सुरु
प्रतिनिधी सुधीर गोखले
सांगली जिल्ह्यातून सिंचनासाठी मागणी वाढल्याने अखेर काल कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहातून एक हजार पन्नास क्यूसेस ने पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मंगळवारी सकाळी विसर्ग सुरु करण्यात आला असून धरणांमधील पाणीसाठा १०१ टीएमसी इतका आहे. यावर्षी सांगली जिल्ह्यासह कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली परिणामी पावसामुळे शेती साठी पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र सध्या लहरी हवामानामुळे आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणी मुळे सांगली पाटबंधारे विभागाने कोयनेतून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी केली. पावसाळा संपल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार कोयना धरण व्यवस्थापनाने पायथा विद्युत गृहातून एक युनिट सुरु करून एक हजार पन्नास क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडले आहे. भविष्यात सांगलीमधून मोठ्या प्रमाणावर सिंचन आणि बिगर सिंचन योजनांसाठी हि पाण्याची मागणी वाढण्याची श्यक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राची वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणाला अनन्य साधारण महत्व आहे या धरणाच्या पाण्यावर अनेक गावांच्या पाणी पुरवठा तसेच सिंचन योजना अवलंबून आहेत. या धरणाच्या पाणी साठ्यातून टेम्भू ताकारी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन सिंचन योजनांची तरतूद आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाला वर्षभर पुरेल अशा पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन करताना तारेवरची कसरतच करावी लागते.
Discussion about this post