- उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धाड पोलीस निरीक्षकांच्या अंगलड शहाजी उमाप यांनी केले नियंत्रण कक्षा संलग्न
बळेगाव प्रतिनिधी: उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोर्टा शिवारात क्लबच्या कारवाईनंतर पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना नांदेड नियंत्रण कक्षा पाठवले आहे या कारवाईमुळे ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे व धंदे सुरू आहेत त्या ठाणेदाराचे धाबे दणाणले आहे उमरी तालुक्यातील गोरठा येथील एका शेतामध्ये जुगार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पातळीवरून मिळाल्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने त्या ठिकाणी कारवाई केली जवळपास सोळा जणांना अटक करून एक लाख 15 हजार 680 इतकी रक्कम व 10 मोबाईल चार दुचाकी असा पाच लाखावर अधिक रकमेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता विशेष म्हणजे हा जुगार अड्डा पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर सुरू होता ही माहिती पोलीस निरीक्षकांना का माहिती नसावी असा प्रश्न वरिष्ठ स्तरावर विचारण्यात आला कारवाईनंतर नांदेड चे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब यांनी पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांना नियंत्रण कक्षाची संलग्न केले आहे.
Discussion about this post