वैजापूर प्रतिनिधी/ अर्जुन शिंदे.
वैजापूर तालुका स्वच्छता मध्ये अग्रेसर असल्याकारणाने वैजापूर तालुक्याला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला होता.
परंतु आता वैजापूर शहरात जिकडेतिकडे कचरा कचरा दिसत आहे. वैजापूर ते येवला रोडवर असणारे वैजापूर तालुक्यातील विनायकराव पाटील महाविद्यालय त्याच्याजवळच असलेले नारंगी सारंगी प्रकल्प या ठिकाणी जागोजागी कचऱ्याचे डिगच डिग पडलेले आहे त्यामुळे जवळ असलेल्या विनायकराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्या कचऱ्याचा दुर्गंध येत असतो त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानिकारक आहे.
तसेच वैजापूर लासुर रोडवर पण जागोजागी कचरा पडलेला आहे लासुर रोडवर असणाऱ्या बेकरी चे व्यवसाय करणारे मजूर आहेत त्यांना पण त्याचा त्रास होत आहे.
वैजापूर गंगापूर या रस्त्यावर ही अनेक ठिकाणी कचराच कचरा दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या त्या कचऱ्याचा त्रास होऊन त्या कचऱ्याचा उग्र असा वास येत असल्याने आरोग्यास हानिकारक आहे.
त्यामुळे नागरिकांचे असे म्हणणे आहे की लवकरात लवकर त्या कचऱ्याची विल्हेवाट करण्यात यावी, व वैजापूर तालुका कचरा मुक्त करावा व पुन्हा वैजापूर शहर स्वच्छतेचा पुरस्कार मिळावा त्यामुळे लवकरात लवकर त्या कचऱ्याची विल्हेवाट करण्यात यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.
Discussion about this post