श्रीगोंदा:-(तालुका प्रतिनिधी ) ४ डिसेंबर..
तालुक्यातील काष्टी गावाजवळील अजनुज रोड येथे एका विहिरीत मध्यम वयाचा बिबट पडल्याची बातमी स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी सौ दिपाली भगत यांनी दौंड येथील इको रेस्क्यू वन्यजीव बचाव पथकाला दिली काही वेळातच सर्व वनकर्मचारी तसेच रेस्क्यू पथकाचे प्राणीमित्र व स्थानिक प्राणीमित्र यांच्या सयुक्त प्रयत्नाने बिबट्याला यशस्वी बाहेर काढले
या वेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सौ दिपाली भगत यांच्याकडून संपूर्ण स्थानिक लोकांना या प्राण्याविषयी माहिती देण्यात आली तसेच संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात बिबट्याचा वावर आहे स्थानिक लोकांनी स्वतः काळजी घ्यावी व आपल्या परिसरातील ऊस तोडीसाठी आलेल्या सर्वाना जागृत करावे असे आव्हान केले
या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी सौ दिपाली भगत तसेच रंजना घोडके(वनरक्षक),चंद्रकांत मरकड (वनरक्षक),रामकृष्ण काळे (वनरक्षक), नितीन डफडे (वनरक्षक),दिनेश हुंबरे (वनरक्षक) तसेच स्थानिक वनकर्मचारी अंकुश खरात (वनपाल दौंड )
अमोल पाचपुते ( वनपाल बारामती)
इको रेस्क्यू दौंड पथकाचे प्रमुख नचिकेत अवधानी,श्रेयस कांबळे, प्रशांत कौलकर , अभिलाष बनसोडे काष्टी येथील स्थानिक प्राणीमित्र संतोष जठार व अमोल पाटोळे यांनी मोलाची कामगिरी केली व बिबट्याला सुखरूप वाचवले.
बिबट्याची प्रकृती एकदम व्यवस्थित आहे तसेच त्याला योग्यवेळी मदत मिळाल्यामुळे त्याचे प्राण वाचले असे नचिकेत अवधानी यांनी सांगितले
Discussion about this post