(ता.प्र) मोईन.
किनवट : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कृतीशिल अभिवादन करण्यासाठी व २६/११ च्या आतंकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, वीर-जवानांना रक्तदान करून अभिवादन करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शुक्रवारी (दि.६) सकाळी १० वाजता रक्तदान शिबीराचे
आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवा पँथर संघटनेचे अध्यक्ष अॅड. सम्राट सर्पे व सचिव निखिल कावळे यांनी दिली. शिबिराचे हे ७ वे वर्षे आहे.
शिबिराचे आयोजन युवा नेते राहुल सर्पे यांच्या सौजन्याने करण्यात येत आहे. शिबिरात उपस्थित राहुन रक्तदान करावे, असे आवाहन युवा पँथर संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे
Discussion about this post