नायगाव प्रतिनिधी/ दीपक गजभारे घुंगराळेकर..
नरसी चौक तालुका नायगाव येथे महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच्या वतीने सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता. अभिवादन सभा व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे…
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा.धम्मप्रिया गायकवाड तहसीलदार नायगाव,मा.गजानन शिंदे तहसीलदार बिलोली, मा.संग्राम कांबळे गटशिक्षणाधिकारी नायगाव, मा.श्रीधर जगताप साह्यक पोलीस निरीक्षक रामतीर्थ, मा.विजय जाधव तलाठी संघटना उपाध्यक्ष,मा. डॉ. संतोष मोरे, मा. गजानन भिलवंडे सरपंच नरसी, मा. इब्राहिम बेग पटेल पोलीस पाटील नरसी यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या अभिवादन सभा व रक्तदान शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे. असे आव्हान फुले शाहू आंबेडकर क्रांती मंच्या वतीने करण्यात येत आहे.नरसी येथे होणाऱ्या 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाच्या अभिवादन सभेस नायगाव तहसीलचे तहसीलदार मॅडम सौ.धम्मप्रिय गायकवाड हे विशेष उपस्थित राहणार आहेत…..
Discussion about this post