समीर बल्की – तालुका प्रतिनिधी
चंद्रपूर : अदानी समूहाची संयुक्त संसदीय समितीमार्फत (जेपीसी) चौकशी करावी, या मागणीसाठी इंडिया आघाडीतील खासदारांनी संसद परिसरात निदर्शने केली. यामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाग घेतला. त्यांच्या सोबत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत दिसत आहेत.
अदानी समूहाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी इंडिया आघाडीतील खासदारांनी संसद परिसरात निदर्शने केली. उत्तर प्रदेशातील संभल येथे झालेल्या हिंसाचारावरूनही सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अदानी समूहाचा बचाव केल्याचा आरोप विरोधकांनी केला. तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्ष निदर्शनांत अनुपस्थित होते.
अदानी समूहावर टीका करणारे बॅनर आणि फलक यावेळी खासदारांच्या हातात होते. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, रजनी पाटील, विशाल पाटील, प्रतिभा धानोरकर, प्रशांत पडोळे, रवींद्र चव्हाण, श्यामकुमार बर्वे, शोभा बच्छाव, नामदेव किरसान, शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, प्रियांका चतुर्वेदी, राजाभाऊ वाझे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, भास्कर भगरे हे महाराष्ट्रातील खासदारही निदर्शनांत सहभागी होते.
Discussion about this post