तालुकाध्यक्षपदी सय्यद हबीब उपाध्यक्ष मारोती चिलपिपरे तर सचिवपदी विनोद तोरणे
कंधार : प्रतिनिधी माधव जाधव
देशातील नंबर एकची संघटना अशी नोंद असलेल्या व्हॉइस ऑफ मिडिया या आंतरराष्ट्रीय संघटनेची शासकीय विश्रामगृह कंधार येथे दि ३ रोजी मंगळवारी सायं ७ वाजता लोकशाही पध्दतीने कंधार तालुक्याची कार्यकारणी जाहीर करण्यासाठी हात वरती करून मतदान घेण्यात आले त्यातून तालुकाध्यक्षपदी सय्यद हबीब तर उपाध्यक्षपदी मारोती चिलपिपरे, सचिव पदी विनोद तोरणे, सहसचिव संतोष कांबळे, कार्याध्यक्ष माधव गोटमवाड, सदस्य मगदूम परदेशी, प्रा जमील बेग, अँड सिद्धार्थ वाघमारे , माधव जाधव, अड. उमर शेख यांची निवड झाली.
या बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी, कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे, उपाध्यक्ष तुकाराम सावंत, सचिव अनिल धमणे पाटील, जिल्हा संघटक ऋषिकेश कोंडेकर, कोषाध्यक्ष सूर्यकुमार यनावार, डॉ प्रदिप राजपूत यांची उपस्थिती होती. बैठकीच्यावेळी संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या सूचनेवरून डॉ. गणेश जोशी यांनी तालुकाध्यक्षाची निवड लोकशाही प्रध्दतीने होणार असल्याचे सांगितले. यावेळी हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्याप्रमाणे वरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमावेळी जिल्हाध्यक्ष डॉ गणेश जोशी यांनी बोलताना म्हणाले, जागतिक पातळीवर पत्रकारासाठी न्याय हक्कासाठी काम करणारी एकमेव संघटना म्हणून व्हाईस ऑफ मीडिया काम करते. पत्रकारासाठी कौशल्य शिक्षण, घरकुल, आरोग्य, निवृत्तीनंतर पेन्शन योजना आदी पत्रकाराच्या प्रश्नासाठी संघटना काम करत आहे.ग्रामीण भागातील पत्रकार सक्षम झाला पाहिजे,छोटे-मोठे उद्योग आदी पंचसूत्री कार्यक्रम घेऊन संघटनेची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. सूत्रसंचलन संतोष कांबळे तर आभार सय्यद हबीब यांनी;केले.
Discussion about this post