सुयोग ठाकरे तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे
तळेगाव दाशासर येथील श्री संत चहाकार महाराज क्रीडा मंडळ तर्फे आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन 30 नोव्हेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते तुषार धनजोडे नरेंद्र रामावत रमाकांत इंगोले.पत्रकार बंधू व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले आणि तळेगाव येथे चार दिवस चाललेल्या या कबड्डी स्पर्धेचे रात्री UP योद्धा क्लब आणि सत्यदेव बाबा क्रीडा मंडळ भारवाडी यांच्यात अंतिम सामना झाला ज्यामध्ये सत्यदेव बाबा संघाने सामन्यात विजेतेपद पटकावले तर सत्यदेव बाबा क्रीडा मंडळाने प्रथम स्थान मिळाले प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व चषकासह .
.21000 रोख देण्यात आली आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पारितोषिक यूपी योद्धा या संघाला 15000 हजार रोख देण्यात आली यामध्ये तृतीय क्रमांक मराठा फ्रेंड्स क्लब सोनगावला चषकासह 10000 हजार रोख व चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक सूर्योदय क्लब जावला घोवा यांना 5000 हजार रोख व चषक देण्यात आले. बेस्ट डिफेंडर भारवाडीच्या अमरला तर उत्कृष्ट रेडर प्रिन्स चौधरी यूपी याला चषक व रोख पारितोषिक देण्यात आले. या कबड्डी स्पर्धेत 35ते40 संघांनी सहभाग घेतला. कबड्डी स्पर्धेच्या यशस्वितेसाठी साहिल जामवले, यश विरूळकर, करण बगाडे, सौरभ बचाने, सचिन वधाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

Discussion about this post