लोणार-सरस्वती-तांबोळा-हत्ता-चिखला बीबी हा मार्ग काटेरी झुडप, वळण व अरुंद रस्ता आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे तसेच साईड पट्टी नसल्यामुळे एस.टी.तसेच मोठे वाहन रस्त्यावर चालत असताना इतर वाहनांना उभे राहणे इतकी सुद्धा जागा नसल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.सरस्वती ते तांबोळा या रस्त्यावर ठिकठिकाणी काटेरी झुडपे रस्त्यावर आलेली आहे, सोबतच तांबोळा गावाजवळ दोन ते तीन किलोमीटर रस्ता हा खड्डेमय झालेला आहे. तांबोळा ते चिखला हा रस्ता चढ-उतार व वळणाचा आहे. या ठिकाणी रस्त्याला कुठल्याच प्रकारची साईड पट्टी नाही. चिखला ते बीबी रस्त्या अरुंद असून खड्डेमय आहे.या मार्गावर मोठ्या प्रमाणात वळण असून,रस्ता अरुंद आहे आणि दोन्ही बाजूने काटेरी झुडपे व गवत निघाल्याने रस्त्याला जंगलाचे स्वरूप आले आहे. रस्ता आहे की शेत रस्ता ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सुद्धा अधून मधून अपघात होत असल्याच्या घटना घडत आहे.
लोणार-तांबोळा-बीबी या मार्गावर अनेक ठिकाणी वळण असल्याने तसेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काटेरी झुडपे व गवत असल्याने वळणावर खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही,तरीही संबंधित विभागाला जाग आली नाही. प्रशासनाला अजून किती बळीची आवश्यकता आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.परिणामी वाहनधारकांना अपघाताला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.
दिवसेंदिवस अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे अपघातात अनेक जण जखमी झाले असून, मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूचे काटेरी झुडपे व गवत कापून साफसफाई करण्याची गरज आहे.
संबंधित विभागाचा गलथान कारभार
गेल्या अनेक वर्षापासून दरवर्षी पावसाळा, हिवाळा या कालावधीत रस्त्याचे दोन्ही बाजूला काटेरी झुडपे व गवत निघाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघातात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडतात. मात्र याकडे संबंधित विभागाच्या गलथान कारभार असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे
Discussion about this post