सुलतानपूर प्रतिनिधी हसन पठाण
संजय रायमुलकर निवडून आले असते, तर मंत्री झाले असते. या माणसानं गत १५ वर्षांत सर्वांना समान वागणूक दिली. अगदी विरोधी पक्षातल्यांनाही आपलंस केलं. गोरगरिबांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्या सोडविल्या. अगदी संपूर्ण रायमुलकर परिवार देखिल सर्वांना जिवाभावाने जपत आलाय. अशा माणसाचा परावभ हा माझ्यासारख्या व्यक्तीला कायम वेदना देणारा आहे, अशा भावना डॉ. हेमराज लाहोटी यांनी जनस्वप्नपूर्तीशी बोलताना व्यक्त केल्या.
डॉ. हेमराज लाहोटी म्हणाले, की जनतेने माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना बहुमताने निवडून आणायचे होते. रायमुलकर यांनी कोणाला काय दिलं नाही, सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. सर्वांना
कुटुंबातील व्यक्तीसारखी वागणूक दिली. खरंतर, संजय रायमुलकर यांच्या नावासमोर माजी आमदार हा शब्द लावणं देखिल आंतरिक वेदना देणारं ठरतंय. कोणत्या शब्दांत भावना व्यक्त कराव्यात, हे कळेनासं झालंय. मी संजय रायमुलकर यांच्या सकारात्मक स्वभावाचा साक्षीदार आहे. त्यांनी
चौकार मारावा, हे अंतःकरणातून वाटतं होतं. त्यासाठी प्रामाणिक कार्यकर्त्यांनी मनापासून कामंही केले, पण अपयश आले. चार हजार आठशे मतं हे तर काठावरचे मतं आहेत, ते पार करता आले नाहीत. अन् नवख्या माणसाचा विजय झाला. हा विजय कायम जिव्हारी लागणारा आहे, असेही ते म्हणाले.
Discussion about this post