– आज वार शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जवाहर विद्यालयात शासनाच्या पत्रकानुसार आदेशित केल्याप्रमाणे सकाळी परिपाठामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री.गोपाळ कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटलावर व हर घर संविधान या व्याख्यानासाठी निमंत्रित केलेले आपल्याच विद्यालयातील सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक श्री.लिंबाजी सुरवसे गुरुजी यांनी अतिशय प्रभावीपणे डॉ.आंबेडकर यांच्या जीवनातील विविध पैलू, विविधप्रसंग सध्याच्या व तत्कालीन परिस्थितीचा लेखाजोखा प्रत्यक्षपणे आपल्यासमोर उभा केला संविधान निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आणि त्यांच्या समवेत असलेले घटना समितीतील सदस्य यांच्या कार्याची सखोल अशी माहिती दिली.
समता बंधुता सदाचार नीती अशा बाबींचा सद्यस्थितीत ऱ्हास होत असलेली खंत श्री. सुरवसे गुरुजींनी व्यक्त केली. त्याचबरोबर संविधानामध्ये याच बाबींमुळे लोकशाही कशी आबादित आहे. यातील उलगडाही श्री. सुरवसे गुरुजी यांनी केला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कुलकर्णी गुरुजी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आणि संविधान यांचे महत्त्व अधिक स्पष्टपणे विद्यार्थ्यांना अवगत करून दिले.इतका महान व्यक्ती पवित्र व्यक्ती, देशावर प्रचंड प्रेम,शरीरातील रक्ताचा थेंब असे पर्यंत देशाप्रती स्वतःप्रती असता ठेवावी लोकांनी स्वतःचे स्वातंत्र्य जपावे,व देश रक्षण करावे. राजकर्ता हा राज्यघटनेप्रमाणे वागला पाहिजे. जाती, धर्म, समानता ठेवणे, नीतीचे समाजकारण असावे,सर्व व्यक्ती समान आहेत,
हे संविधान शिकवते. संविधान अमर रहे असा नारा दिला. यावेळी विद्यालयातील दहा विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सुंदर भाषणे केली या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर वही आणि पेन अशा स्वरूपात बक्षीस वाटप केले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री सय्यद गुरुजी,जेष्ठ कलाशिक्षक श्री. के.टी. गायकवाड गुरुजी पत्रकार बंधू श्री लक्ष्मण दुपारगुडे, श्री मुकरे, सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.रोहित मोरे गुरुजी यांनी केले तर आभार
श्री. सय्यद गुरुजी यांनी मानले. तसेच आपल्याच जवाहर उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त हर घर संविधान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री गुलाब सय्यद गुरुजी यांनी भारतीय संविधान या विषयावर विद्यार्थ्यांना शिक्षकांना व पालकांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.
वरील प्रमाणे सर्व कार्यक्रमाची रूपरेषा आणि सांगता यशस्वीपणे संपन्न झाली.
🔴 शब्दांकन – कलाशिक्षक श्री. के.टी. गायकवाड गुरुजी जवाहर विद्यालय अणदूर.
Discussion about this post