
“एक इसम ताब्यातः वजन काट्या सह सुरा आणि ६० किलो मांस जप्त..
रावेर तालुका प्रतिनिधी : मनोज सवर्णे..
सावदा :- आज दि.१४ मार्च रोजी सावदा पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल पाटील यांना वाघोदा बुद्रुक तालुका रावेर येथे गोवंश जातीच्या जनावरांच्या मासांची विक्री चालू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.
या अनुषंगाने वाघोदा बुद्रुक येथे आएशा मस्जीदच्या बाजुला असलेल्या एका पजी शेडमध्ये सावदा पोलिसांनी छापा टाकला असता. सदर ठिकाणी गोवंश जातीच्या जनावरांच्या मासांची विक्री करणाऱ्या इसम नामे शेख नईम शेख अयुब कुरेशी, वय-४७ रा.रसलपुर तालुका रावेर यास तात्काळ ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचे ताब्यातुन १२ हजार रुपये किमतीचे ६० किलो मांस एक वजन काटा व मांस कापण्यासाठीचा सुरा सह रोख रुपये पोलीसांनी जप्त केले असून सदर आरोपीविरुध्द सरकार तर्फे फिर्याद देवून सावदा पोलीस स्टेशन येथे गुनोक्रं ६०/२०२५ महाराष्ट्र प्राणी सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५ (ब] [क], ९.९ (अ), भारतीय न्याय सहीता २०२३ चे कलम ३२५.२७१.३ (५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम १९५१ चे कलम १०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहेकों विनोद पाटील हे करीत आहे.
सदर ठिकाणी मांस विक्रीच्या बातमीची खाजी करण्यासाठी पथकात सावदा पोलीस स्टेशनचे पोहेकॉ विनोद पाटील, पोहेकॉ किरण पाटील, पोकों बबन तडवी, पोकों मनोज तडवी, पोकॉ नामदेव कापडे, पोहेकों संजीव चौधरी यांनी सपोनि विशाल पाटील यांचे मार्गदर्शन खाली कामगिरी यशस्वी केली. सदर प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील यांनी जनतेला आवाहन केले आहे की, ज्या ज्या ठिकाणी गोवंश जातीच्या जनावराची मांस विक्री होत असेल त्याबाबत पोलीस ठाणे येथे माहीती दयावी सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणी माहिती देणारांची नावे गोपनिय ठेवण्यात येतील..
Discussion about this post