कॉलेज कर्मचारी धकिते यांच्या विरोधात विद्यार्थिनीची तक्रार एस एन मोर महाविद्यालयातील प्रकार टी.सी. न मिळाल्याने विध्यार्थीनीची पोलीस ठाण्यात तक्रार गोंदिया शिक्षण संस्थेतील प्रकार .तुमसर: येथील एस. एन. मोर कॉलेजच्या एका विद्यार्थिनीने टी.सी. (ट्रान्सफर सर्टिफिकेट) आणि कागदपत्र परत मिळत नसल्यामुळे त्रस्त होऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मयुरी अमित सावरकर, मूळ रहिवासी बोरी,हिने या प्रकरणात पोलिसांकडे आपली व्यथा मांडत तक्रार नोंदवली आहे.
मयुरीने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात मयुरीने एस. एन. मोर कॉलेजमध्ये बीएससी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतला होता. प्रवेश प्रक्रियेत मयुरीने टी.सी. व इतर शैक्षणिक कागदपत्रे कॉलेजच्या कर्मचारी धकीते यांच्याकडे जमा केली होती.
मात्र, कौटुंबिक मतभेद आणि वैयक्तिक अडचणींमुळे मयुरीला नियमित शिक्षण घेता आले नाही.पुढील शिक्षणासाठी टी.सी. आवश्यक असल्याने मयुरीने पुन्हा कॉलेजमध्ये जाऊन टी.सी. परत मागितली. मात्र, धकीते यांनी हे कागदपत्र तिच्या कुटुंबीयांना दिल्याचे सांगितले. मयुरीने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला, परंतु त्यांनी टी.सी. परत देण्यास नकार दिला.
मयुरीने या संदर्भात पुन्हा धकीते यांच्याकडे विनंती केली असता, त्यांनी तिला उर्मटपणे उत्तर देत, “तुझी तक्रार ज्या स्तरावर करायची आहे, तेथे कर,” असे सांगितले. धकीते यांचा हा प्रतिसाद मयुरीसाठी आणखी निराशाजनक ठरला.
——-@—–पोलीस तक्रारीचा आधार..कागदपत्रे परत मिळण्यास हतबल झालेल्या मयुरीने थेट तुमसर पोलीस ठाणे गाठले. तेथे धकीते यांच्या विरोधात लेखी तक्रार दाखल करत, आपले कागदपत्र व टी.सी. परत मिळवून देण्याची मागणी केली.पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार स्वीकारली असून, तपास सुरू केला आहे.
मयुरीच्या तक्रारीनुसार, कर्मचारी धकीते यांच्याकडून माहिती घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल,असे पोलिसांनी सांगितले.——-@——प्रकरणाची संवेदनशिलता विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या शैक्षणिक कागदपत्रांशी संबंधित या प्रकरणामुळे शिक्षण संस्थांमध्ये कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
कागदपत्र परत न मिळाल्याने विद्यार्थिनीचे पुढील शिक्षण अडचणीत आले आहे.विद्यार्थिनीसाठी या प्रकरणाचा सकारात्मक निकाल होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तर धकीते यांच्यावर शिक्षण संचालक मंडळ कोणती कारवाई करते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.तुमसर तालुका प्रतिनिधी अनिल कारेमोरे 9860827541
Discussion about this post