चिपळूण :– वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्टचे चेअरमन प्रशांतजी यादव साहेब यांच्याकडे शिरगाव वरची वाडी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहाची मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली होती. या मंदिरामध्ये होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह व इतर समाजोपयोगी कार्यक्रमाकरिता या सभागृहाचा वापर होत असतो ही बाब लक्षात घेऊन यादव साहेबांनी या मागणीची तत्काळ पूर्तता केली.
आज दिनांक ०५ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या हरिनाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी या सभागृहाचे उद्घाटन श्री. प्रशांतजी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले. तसेच शिरगाव वरचीवाडी ग्रामस्थांतर्फे यादव साहेबांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जेष्ठ ग्रामस्थ सदाशिवराव अप्पा शिंदे, सुधाकर भाई शिंदे, सदाशिवराव ज्ञा. शिंदे, शिवसेना नेते सुधीरभाऊ शिंदे, शिरगाव सोसायची माजी चेअरमन व राष्ट्रवादी तालुका सचिव श्रीधरभाई शिंदे, बाबूशेठ शिर्के, जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन पवार, सतिशराव शिंदे, माजी उपसरपंच गणेशराव शिंदे, युवक तालुकाध्यक्ष रोहन नलावडे, संजय डेरवणकर, प्रदीप शिंदे, जयवंत शिंदे, विजयराव शिंदे, सुरजराव शिंदे, जितेंद्र शिंदे, उमेश कांबळी, धीरज मोरे, दत्ताराम बागवे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते
Discussion about this post