मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री शिर्डी वरून नाशिक इथे आलेली ही बस ही महामार्ग बस स्टॅन्ड मध्ये येत असताना चालकाचं बस वरील नियंत्रण सुटले बस थेट चौकशी कक्षाला जाऊन धडकली यामध्ये 23 वर्ष्याच्या महिलेचा मृत्यू झाला असून उर्वरित दोन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय उपचार चालू आहे पोलिसांना माहिती मिळताच महामार्ग पोलीस यांनी तात्काळ महामार्ग बस स्टॅन्ड वर धाव घेतली व आरोपी बस चालक याला ताब्यात घेतले आहे व त्यावर गुन्हा दाखल केला आहे पुन्हा एकदा प्रवाश्याचा सुरक्षा प्रश्न उपस्तित झाला आहे आता यावर परिवहन विभाग काय निर्णय घेणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Discussion about this post