खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील देवीच्या परिसरातील बटाटा पिक जोमात असून अंतर मशागतीला वेग आलेला आहे मागील दोन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकाची नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी फवारणी खुरपणी व खत टाकण्याचे काम करीत आहेत
याबाबत सांगुर्डी शेतकरी श्री गोरक्षनाथ भसे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की बटाटा हे नगदी पीक असून तीन महिन्याची पीक आहे उत्पादन खर्चामध्ये वाढ झाल्याने व निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे परंतु यावर्षी पीक जोमदार आल्यामुळे पिकांचे संरक्षण करणे हे अनिवार्य आहे

Discussion about this post