प्रतिनिधि :- शेख मोईन.किनवट:तालुक्यातील मांडवा येथिल सुलोचनाबाई संतराम मुंडे (वय वर्ष ७२) यांचे ८ डिसेंबर रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन असून आज दुपारी त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोवर्धन मुंडे यांनी अग्नीसंस्कार केले. त्यांच्या पश्चात तीन मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे. सुलोचनाबाई मुंडेंना ८डिसेंबर रोजी सायंकाळी हृदय विकाराचा झटका आल्याने त्या गतप्राण झाल्यात. सुलोचनाबाई ह्या दिल्ली येथिल राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचेवरीष्ठ अन्वेशक गोवर्धन मुंडे, सत्यनारायण मुंडे आणि वसंत मुंडे यांच्या त्या मातोश्री आहेत.
मुंडे बंधूंचे वडील स्व. संतराम मुंडे यांचे ८ डिसेंबर २००२ रोजी निधन झाले होते. आणि ८ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या आई सुलोचनाबाईंना देवाज्ञा झाली, ८ तारीख आणि डिसेंबर महिन्याचा योगायोग आलाय. अंत्ययात्रेस प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
Discussion about this post