[09/12, 11:26 pm] +91 99755 69663: संगमनेर दि.9 —बांगलादेश मधील हिंदू धर्मियांचे अध्यात्मिक गुरु चिन्मय कृष्णदास यांना बांगलादेश सरकारने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने अटक केली आहे. त्याचबरोबर तेथील अल्पसंख्यांक असलेला हिंदू धर्मियांवर सातत्याने विविध हल्ले होत आहेत. यामुळे बांगलादेश मधील हिंदू सह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहेत. तरी आपण तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून चिन्मय कृष्णदास यांच्या सुटकेबरोबर बांगलादेश मधील हिंदू धर्मियांना संरक्षण मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.[09/12, 11:29 pm] +91 99755 69663:
हिंदू धर्माच्या शिकवणीनुसार मानवता हाच धर्म अत्यंत महत्त्वाचा आहे . बांगलादेशमध्ये मात्र जाणीवपूर्वक कट्टरतावाद वाढवून राजकारणासाठी हिंदू धर्मियांना त्रास दिला जात यामुळे तेथील हिंदू धर्मीय असुरक्षित झाले आहे.कट्टरतावादी अनेक नेते बेताल वक्तव्य करून हिंदू धर्मा विरोधी चिथावनी देत आहे. यामुळे अनेक ठिकाणी हिंदू बांधवांवर हल्ले होत आहेत. यामुळे तेथील हिंदू बांधव- महिला अत्यंत भयभीत वातावरणात आहे.
Discussion about this post