मुंबई प्रतिनिधी:
दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संत रोहिदास सभागृह, अशोक मिल कंपाऊंड सायन बांद्रा लिंक रोड धारावी येथे आयोजित विजयोत्सव कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड यांच्या विजया निमित्त सत्कार समारंभ संपन्न झाला
यावेळी नवनिर्वाचित आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड म्हणाल्या की माझ्या धारावी परिवारातील, काँग्रेस व इंडिया-महाविकास आघाडीतील ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि सहकाऱ्यांची भक्कम साथ तसेच कार्यकर्त्यांची अथक मेहनत या साऱ्यामुळेच धारावी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयश्री आमच्या वाट्याला आली, यासाठी मी फार भाग्यवान आहे.
आज दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संत रोहिदास सभागृह, धारावी येथे आयोजित विजयोत्सव कार्यक्रमात सर्व ज्येष्ठांचे आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. याप्रसंगी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड ताई यांनी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली.
धारावीच्या न्यायाची आपली लढाई निरंतर सुरू राहील आणि विधानसभेत सर्वसामान्यांचे प्रश्न जोरकसपणे मांडून त्यासाठी न्याय मिळेपर्यंत आवाज उठवत राहीन, असा विश्वास सर्वांना याप्रसंगी दिला
Discussion about this post