


या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटनांबरोबरच सर्व व्यापाऱ्यांनी बांधवानी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन अत्याचाराचा निषेध करत या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने लक्ष घालावे अशी मागणी केली. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांकडे पाठविण्यात आले आहे.
मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. हिमायतनगरमध्ये मंगळवारी या मोर्चाची सुरूवात येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर हनुमान चालिसा पठणाने सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्त्याने हाती
निषेधाचे, विविध संदेश देणारे फलक घेऊन शेकडोच्या संख्येने सकल हिंदू समाजातील युवक, ज्येष्ठ नागरिक सामील झाले होते. बांगलादेशात हिंदूवरच नाही तर अन्य अल्पसंख्यक समुदायावर अनन्वितअत्याचार केले जात आहेत. तरीदेखील संयुक्त राष्ट्र संघ व मानवाधिकार परिषद याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. बांगलादेशात हिंदू संत, मंदिर, हिंदू संस्था असुरक्षित असून, दररोज हल्ले होत आहेत. त्यामुळे ही निषेध रॅली श्री परमेश्वर मंदिरासमोर आल्यानंतर विविध संत, महंत व पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. नंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार ताडेवाड यांना देण्यात येऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चोख बंदोबस्त लावण्यात आला..
Discussion about this post