वरोरा :
तालुक्यातील शेगाव बु ग्रामपंचायत सद्या चांगलीच चर्चेत येत आहे. जनतेच्या समस्या बद्दल उदासीन असलेली ही ग्रामपंचायत नेहमीच जनतेला मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरत आहे.
त्यातच आता देशभर स्वच्छ भारत मिशन सुरुवात असताना शेगाव ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरत आहे. मागच्याच आठवड्यामध्ये शेगाव मधील विविध समस्याना वाचा फोडण्याचे काम गावातील नागरिकांनी केले असताना या आठवळ्यात कचरा कुंडी प्रकरण समोर आले आहे. या मध्ये शेगाव ग्रामपंचायत ने मागील वर्षी डिसेम्बर २०२३ मध्ये ५ ते ६ लाख रुपये किंमतीच्या जवळपास १०० हून अधिक कचरा कुंडी गावामध्ये चौका चौकात लावण्यासाठी खरेदी केल्या होत्या. यात ग्रामपंचायत मध्ये असलेल्या निधीतून हा खर्च करण्यात आला. परंतु मागील वर्षभरापासून या कचराकुंडी गावातील अंगणवाडी क्र २ मध्ये एका खोलीत धूळ खात असल्या कारणाने जनतेला त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे.
त्यामुळे शेगाव ग्रामपंचायत मध्ये हे चालले तरी काय ? जनतेच्या कामासाठी आलेल्या निधीचा हा असा दुरुपयोग शेगाव ग्रामपंचायत कोणाच्या आशीर्वादाने करीत आहे. अशी कामे जर या कचरा कुंडी लावायच्या नव्हत्या तर त्या खरेदी केल्या कशाला ? या कचरा कुंडी प्रकरणाची वरिष्ठ अधिकारी चौकशी करतील का ? असे अनेक प्रश्न गावाकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे..
Discussion about this post