
रामेश्वर तालुका भूम जिल्हा धाराशिव येथे वैभव सातपुते हा संध्याकाळी आठ वाजता बाथरूम साठी शेतात गेला असता त्यास बिबट्या दिसला.त्यांनी तात्काळ पोलिस पाटील रोहित नागटिळक सरपंच किसन अण्णा सानप उप सरपंच श्रीराम खंडागळे शिवसेना महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष अर्चना दराडे व ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रमणी गायकवाड यांना या घटनेची माहिती दिली.
त्यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क करून वन विभागाची टीम रामेश्वर येथे बोलावली तेथील ठसे पाहिले असता वन अधिकारी दांडगे साहेब यांनी ते ठसे बिबट्याचे च असल्याचे सांगितले आहे. तरी वन विभागाचे अधिकारी रामेश्वर येथे गस्त देत आहेत व रामेश्वर येथे पिंजरा ही लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे..
Discussion about this post