परभणी .. परभणीत बाजारपेठातील दगडफेकीसह जाळ पोळीच्या घटनांमुळे मोठ्या प्रमाणावरील नुकसानी चिता तात्काळ पंचनामे करावेत व संबंधित व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई वितरित द्यावी अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघाने राज्य सरकारकडे केली असून जोपर्यंत मावेजा मिळणार नाही संबंधित अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली जोपर्यंत होणार नाही. तोपर्यंत बाजार पेठ बेमुदत बंद राहतील असा इशाराही दिला आहे.
संविधान शिल्पकार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमानानंतर बुधवारी बंद दरम्यान हिंसक घटना घडल्या आंदोलकांनी थेट दुकाने वाहनांना लक्ष करत जाळपोळ केली. यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. या घटनेनंतर जिल्हा व्यापारी महासंघाने गुरुवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बैठक घेतली. व्यापाराच्या उपस्थितीतील शिवाजी चौकातील या बैठकीतून.10.डिसेंबर रोजी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीला धक्का मारण्याचं काम ज्या समाजकंटकाने केले त्या घटनेचा व्यापारी महासंघाने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. त्याचबरोबर दि.11. डिसेंबर रोजी परभणी शहर कडकडीत बंद असताना निवेदनाचे निमित्त करून ज्या समाजकंटकाने बाजारपेठ फोडण्याचे काम केले. त्या समाजकंटकांचे सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आला. प्रशासनाने म्हणजेच परभणीचे जिल्हाधिकारी व परभणीचे पोलीस अधीक्षक यांनी समाजकंटकाला परभणी फोडण्याची मुभा दिली असा आरोप यावेळी करून त्या प्रशासनाची बदली व निलंबन त्याचबरोबर व्यापारांच्या दुकानांच्या नुकसान झालं त्यांचा पंचनामा करून त्यांना शासनाने मावेजा देईपर्यंत बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाने घेतला.
सदरील बैठकीला व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके. कार्याध्यक्ष. नितीन वट्टमवार. उपाध्यक्ष कोषाध्यक्ष. अशोक माटरा परभणी जिल्हा केमिस्ट्री डर्गिस्ट संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री. बाल कृष्ण गिराम. आदींनी मार्गदर्शन केले. बाजारपेठ बंद करण्याचे सर्वांनी आवाहन केले सर्व परभणी शहरातील व्यापारी बंधूंना विनंती आहे. की आपण आपली प्रतिष्ठान बंद ठेवून आपलं नुकसान भरपाई मिळेपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात सहकार्य करावे ही विनंती केली.
Discussion about this post