अक्कलकोट(तालुका प्रतिनिधी-सैदप्पा झळकी)दि.१२शिक्षकांच्या प्रामाणिक अचूक प्रयत्नांने मुल संस्कारी बनत आहे हे कौतुकास्पद बाब आहे असे मत दुधनीतील समाज सेवक चंद्रकांत बोनार यांनी व्यक्त केली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील दुधनी जि.प.प्राथ.मराठी केंद्र शाळेत नुकत्याच शाळा व्यवस्थापन समिती व पालक सभा आयोजित केली होती.या सभेत शाळेत खुर्च्यांचे अभाव असल्याचे उणीव झाल्याचे श्री चंद्रकांत बोनार यांचे निदर्शनास आल्याने त्वरीत दुकानात जावून तब्बल एक डजन (बारा खुर्च्या)खरेदी करुन शाळेस भेट म्हणून दिली आहे.त्यानिमित्त आज शाळेत त्यांच्या सत्कार शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांच्या वतीने श्री चंद्रकांत बोनार यांच्या सत्कार अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती व जि.प.प्राथ.मराठी केंद्र शाळा दुधनी चे अध्यक्ष गोरखनाथ धोडमनी,सदस्य मिहिदिमिया जिडगे शिक्षण प्रेमी सैदप्पा झळकी व श्री पोमू राठोड सर सुहास पवार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले,की पैसा संपत्ती सर्वांकडे असते पण ती निस्वार्थपणे दान करणे क्वचितच लोक पाहायला मिळते याचे एक उदाहरण आज पहायला श्री बोनार यांचा रुपांने मिळाले.त्यांचे मनापासून धन्यवाद मानणे आमचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन सर्वांनी व्यक्त केली आहे.
यावेळी श्री.गोरखनाथ धोडमनी, श्री सैदप्पा झळकी श्री मिहिदमिया जिडगे, श्री सुहास पवार सर,श्री रविकुमार कोरचगाव सर,संजीवकुमार बेण्णेसूर सर,सौ.शोभा म्हेत्रे म्याडम,सौ.अंजली गुंजोटे म्याडम आदींसह सर्व मुला मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post