
सोयगाव :
प्रतिनिधी
तालुक्यातील घोसला येथे अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य तपासणी शिबिरात २० बालकांचे आरोग्य तपासणी सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ सचिन हाके यांनी केली.यानंतर या बालकांना संजय शहापूरकर यांच्या हस्ते मोफत औषधे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना संजय शहापूरकर यांनी सांगितले की कुपोषण कमी करण्यासाठी आता बालकांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन प्रत्येक उपकेंद्रात होणार असून त्यासाठी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांचे सहकार्य लाभणार आहे.
घोसला येथे या उपक्रमाचे सुरुवात झाली असून आता सतत त्याने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरात गर्भवती मातांचे आरोग्य तपासणी करण्यात आली त्यांना लोहयुक्त औषधे वाटप करण्यात आली.
याप्रसंगी डॉ सचिन हाके आरोग्य सेवक विजय पंडित अंगणवाडी सेविका लिलाबाई पाटील छाया पाटील मदतनीस देवकाबाई सोनगीर पुष्पा पाटील आशा सेविका मंदाबाई पाटील व योगिता जोहरे उपस्थित होते.
Discussion about this post