आज दिनांक 13/12/24 शुक्रवारी रोजी बहुजण जणता पक्षाची टीम मौजे लिमगाव ता पैठण जी छत्रपती संभाजी नगर येथे मातंग समाजाच्या रणजित ससाणे व त्यांच्या साथीदाराला कारखान्याच्या कर्मचारी यांनी नग्न करून दांड्याने मारहाण करीत आईबहीणीवर अश्लिल भाषेत अतिशय घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली होती
त्या संदर्भात बहुजण जणता पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष मोटे आण्णा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची टीम विचारपूस करण्यासाठी लिमगाव येथे गेली असता श्री सचिन भाऊ साठे व तालुक्यातील कार्यकरते श्री अविनाश मिसाळ,श्री लहु गायकवाड श्री धर्मराज मिसाळ, श्रीअनिल आहेर, जिल्हा अध्यक्ष सुखदेव खाजेकर कोर कमीटी अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, श्री साहेबराव कारके,
ता अध्यक्ष विशाल शरणागत, ता उपाध्यक्ष साबळे, व बहुजण जणता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते, मोटे आण्णा यांनी पिडीत रणजित ससाणे याच्याशी चर्चा केली, ऍट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल केल्याचे सांगितले,आपल्या भाषणात बोलताना मोटे आण्णा यांनी संघटन कशासाठी महत्त्वाचे आहे
हे समजून सांगितले यावेळी पैठण तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी मोटे आण्णा यांचे आदरपूर्वक स्वागत केले व समाजाच्या अडचणी वर चर्चा केली
Discussion about this post