शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील भारतीय संविधान प्रतीकृतीची समाज कटंकाने तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ आरोपीवर कडक कारवाई नार्को टेस्ट करावी.
निषेध आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रकाराची चौकशी व निरपराध अटक केल्याची सुटका करावी.
नुकसानग्रस्त व्यापाऱ्याचे योग्य पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी रघुनाथ गावडे , पोलीस अधिक्षक यशवंत काळे यांना भेटून दिले आहे.
माझ्या समवेत पीआरपीचे नेते गौतम मुंडे, काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुधीर कांबळे , बुद्धभूषण हत्तीअंबिरे, उत्तम गायकवाड, प्रदीप जोंधळे , राजेश रणखांबे, अँड. मोती शिंदे, अजय रसाळ, मिलिंद घुसळे, मंचक खंदारे , अमोल धाडवे, अजय वाघमारे ,आकाश गुळवे इत्यादीची उपस्थिती होती.
Discussion about this post