कणकवली तालुक्यातील कासारडे या गावांमध्ये पारकरवाडी या ठिकाणी दत्त जयंती उत्सव गेले कित्येक वर्षे मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने साजरा केला जातो. या ठिकाणी कासाडे गावातील ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या बऱ्याच गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. दत्ताचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक येत असतात. पहिल्याच दिवशी पालखी सोहळाच्या वेळी लोक पालखी नाचवताना ढोल ताशांच्या गजरात मंत्रमुग्ध होतात. दत्त जयंती उत्सव कासारडे पारकरवाडी मध्ये तीन दिवस साजरा केला जातो येथील गावातील ग्रामस्थ तसेच मुंबई येथील चाकरमानी ही मोठ्या संख्येने या दिवशी दत्त जयंतीला येतात आणि खूप मोठ्या थाटामाटणे हा दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो.
Discussion about this post