



भरत पुंजारा/ पालघर..
डहाणू, १५ डिसेंबर २०२४: ग्रामीण भागातील आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना लग्नासारख्या महत्त्वाच्या समारंभासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याच समस्येची दखल घेत रोशनी फाउंडेशनने २५ गरजू आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आदिवासी पारंपरिक पद्धतीने धवलेरी यांच्या मार्फत तलोटे येथे उत्साहात पार पडला.
ग्रामीण कुटुंबांमध्ये लग्नासाठी मोठ्या खर्चाचा प्रश्न मोठा अडथळा ठरतो. मानपान, चांगले कपडे, भेटवस्तू, मंडप आणि डीजे यांसारख्या खर्चांमुळे गरिब कुटुंबे लग्न उरकण्यात असमर्थ ठरतात. यासाठी रोशनी फाउंडेशनने गरजू कुटुंबांना मदतीचा हात देत या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे नेतृत्व रोशनी फाउंडेशनचे अध्यक्ष संजीव मुछला आणि व्यवस्थापकीय ट्रस्टी गीता मुछला यांनी केले. या प्रसंगी तलोटे गावचे सरपंच विजय कोलते, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंचवीस आदिवासी जोडप्यांचे विवाह पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले.
नवविवाहितांना संसारासाठी भांडी, कपडे व अन्य उपयुक्त वस्तू भेट देण्यात आल्या.
हा विवाह सोहळा आदिवासी परंपरांचे जतन करत गरिब कुटुंबांना दिलासा देणारा ठरला.
हा सोहळा सामाजिक एकोप्याचा उत्कृष्ट नमुना ठरला असून, गरिबांसाठी उपयुक्त असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. रोशनी फाउंडेशनने गरजू कुटुंबांना दिलेला हा आधार खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावकारे सरांनी केले. तलोटे येथे पार पडलेला हा सामूहिक विवाह सोहळा गरिब कुटुंबांसाठी मोठा आधार ठरला आहे..
Discussion about this post