
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी अतिशय सुंदर मार्मिक लिहले गायले आहे.
येता तरी सुखे या!जाता तरी सुखे जा !
कोणावरी न बोजा! या झोपडीत माझ्या !
येणाऱ्याच स्वागत आहे आणि जाणाऱ्याना बंधन नाही, हे ते येणाऱ्या जाणाऱ्या बाबत लिहतात तेच आपण या जाणाऱ्या वर्षांला निरोप व येणाऱ्या वर्षाच्या स्वागता बाबत जल्लोष करुन म्हणु या
बहुसंख्य जन हे ३१ डिसे साजरा करताना म्हणतात त्याच वेळी आपण हिच भावना ठेवली पाहीजे त्यात
कोणावरी न बोजा! या झोपडीत माझ्या!याला शासनकर्त्यानी व्यापक अर्थ दिला पाहिजे कोणावरही न बोजा या महाराष्ट्रात माझ्या नको
आज सामान्य माणसाचं जगणं हे अस्मानी सुलतानी संकटाच जगणं झालं आहे.हे
लोकांच्या दैनंदिन व भौतिक परिस्थितीच्या बाबतील जगण्या बाबत त्यांनी दुरदृष्टीने म्हटले असावे.
सद्य परिस्थितीत आम्ही जे भोगले, भोगायला लावले ते आम्ही सहन केले आता तरी ते भोगायला लावु नका कसलाही परिणाम होऊ देऊ नका,
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढे जे म्हणतात ते या महाराष्ट्राला तंतोतंत लागु झाले पाहिजे.
पाहून सौख्य माझे1 देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे1 या झोपडीत माझ्या
तुकडोजी महाराज म्हणतात, माझ्या झोपडीतली शांती किंवा सौख्य प्रत्यक्ष देवेंद्राला लाजवेल इतके भरभरून आहे. म्हणजेच स्वर्गातल्या सुखाइतकेच किंवा त्याहूनही अधिक ते शाश्वत आहे.
कारण ते बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून नाही तर मनाच्या स्थितीवर टिकलेले आहे.हेच भावनिक मानत आम्ही गत वर्ष काढले आता येणारे वर्ष स्वर्ग सुखा इतके शाश्वत नसले तर सामान्य माणूस म्हणुन जगण्यात इतपत तरी असु द्या.
२०२४ ला जाता जाता नवे सरकार आले.२०२५ ची कारकिर्द हि या सरकारच्याच हाती आहे.अस्मानी संकट शासनच आणत असते वृक्ष तोड केली.नैसर्गिक जंगले तोडुन सिमेंट क्राॅक्रिटची जंगले उभी केली.नदी पात्र अडविली. पर्यावरचा नाश केला अस्मानी संकट येतीलच
सुलतानी म्हणाल तर आकाशाला भिडणारी महागाई कधी कसा कोणता टॅक्स लावला जाईल कोणता फतवा काढला जाईल याचा भरवसा नाही.सामान्य माणसाला जगता येईल असे २०२५च्या वर्षाचा राज्यकारभार चालवा.तशी प्रार्थना येणाऱ्या वर्षासाठी करा.
कथनी करणी एकच असली तर हि महाराष्ट्राची धरणी खरोखरच सुजलाम सुफलाम होईल.
सामान्य माणुस हा सातत्याने म्हणत असतो जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा
आण्णा धगाटे जेष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता..
Discussion about this post