
भूम तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी चे तालुका अध्यक्ष हनुमंत पाटोळे यांनी उपविभागीय अधिकारी भूम यांना असे निवेदन दिले आहे की गोरमळा चुंबळी वालवड रस्ता. वारेवडगाव नवलगाव रस्ता. पाटसांगवी ते इडा जवळा रस्ता. भूम शहर ते वारेवडगाव कासारी भोगलगाव चींचपुर बेलगाव साकत फाटा रस्ता. साडे सांगवी ते डोंबाळे वस्ती रस्ता. वाल्हा रोड ते सामनगाव रस्ता. बावी फाटा ते बावी भवानवाडी रस्ता. नवीन रस्ता बावी ते मात्रेवाडी रस्ता. वडगाव ते घुलेवाडी रस्ता. वरील कामे बंद अवस्थेत असून काही कामाची निविदा निघून सुधा कामे अद्याप चालू नसून. सदर कामे कारखाना इड्या च्या मधली असून वाहन धारक व शेतकरी यांचे मोठे नुकसान होत असून. वाहने पलटी होत असून. त्या शेतकऱ्यास भुरदंड होत असून. रस्ते खराब असल्यामुळे येस टी देखील बंद होत असून शाळेच्या मुलांचे देखील नुकसान होत आहे. तरी या निवेदनाचा दिनांक 1 जानेवारी पर्यंत योग्य निर्णय न झाल्यास 1 जानेवारी पासून आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी निवेदन दिले आहे..
Discussion about this post